01 October 2020

News Flash

प्रवीण परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर

भूषण गगराणी नगरविकास विभागाच्या सचिवपदी

संग्रहित छायाचित्र

अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास व जलसंपदा) प्रवीण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती झाली असून, केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मंगळवारी मान्यता दिली.

परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर जात असल्याने त्यांच्या परदेशातील सेवेस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त विषयक समितीने परदेशी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील ११ महिन्यांच्या प्रतिनियुक्तीस मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन विभागात आंतरराष्ट्रीय कार्यक्र म विभागाचे समन्वयक म्हणून परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. जिनीव्हामध्ये परदेशी यांचे कार्यालय असेल. केंद्राच्या मान्यतेनंतर परदेशी यांना राज्याच्या सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सेवेत लगेचच रुजू होणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. लातूर भूक पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम यशस्वीपणे केल्यानंतर परदेशी यांनी सात वर्षे संयुक्त राष्ट्रसंघात नैसर्गिक आपत्तीनंतरचे पुनर्वसन या महत्वाच्या क्षेत्रात काम केले होते. प्रवीण परदेशी यांना राज्याच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आल्यावर राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या सचिवपदी अतिरीक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची नियुक्ती केली.

तीन अधिकारी सचिवपदी

राज्याच्या सेवेतील अपूर्व चंद्र, अरविंद सिंग आणि डॉ. संजय चहांदे हे तीन अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिव पदासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी अपूर्व चंद्र आणि सिंग हे सध्या केंद्राच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आहेत. डॉ. चहांदे हे मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आहेत.

पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. राज्याच्या सेवेतील डॉ. श्रीकर परदेशी हे गेली पाच वर्षे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. अलीकडेच ते तिथून सेवामुक्त झाले. त्यानंतर परदेशात अभ्याक्रमासाठी त्यांची निवड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:26 am

Web Title: proficient foreigners on deputation to the united nations abn 97
Next Stories
1 करोनामुळे जलसंकट!
2 साखर कारखाने सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान
3 गणेशभक्तांपुढील विघ्न दूर!
Just Now!
X