रेल्वे मार्गावरील वीजपुरवठा काही वेळासाठी खंडीत झाल्याने रेल्वे वाहतूकसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकलसोबतच पुणे-मुंबई अशी दोन्ही बाजूची तसेच कसारा मुंबई अशी दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावत आहेत.
रेल्वेसेवा विस्कळीत होण्याचे प्रकार जरी घडत असले तरी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रेल्वे सेवा बंद होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सीएसटी ते इगतपुरी आणि सीएसटी ते खंडाळा मार्गावरील वीजपुरवठा ७ ते ८ मिनिटं खंडित झाल्याने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. वीजपुरवठा पूर्ववत झाला असला तरी यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणा-या मंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी १२पर्यंत वेळापत्रक सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.