News Flash

अबब! मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहार; तब्बल १००० कोटींना विकलं गेलं घर

डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी हे घर विकत घेतलं आहे

संग्रहित (PTI)

करोना काळात इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मात्र आता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना हे क्षेत्रही पुन्हा एकदा उभारी घेत आहे. दरम्यान मुंबईतील श्रीमंताचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. मलबार हिलमध्ये तब्बल १००० कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे घर विकत घेतलं आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज असं या इमारतीचं नाव आहे.

३१ मार्चला हा व्यवहार झाला. राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिलमध्ये १००० कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार या घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.

राधाकृष्ण दमानी कोण आहेत –
राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातल्या अनेक मोठ्या तसंच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे.

भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात.

राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातही गुंतवणूकदार आहेत. राधाकृष्ण दमानिया यांनी २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये ६१०० कोटी रूपयांची वाढ झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:33 pm

Web Title: radhakrishnan damani buys new home in malabar hill for 1000 crores sgy 87
Next Stories
1 अनुकूल व्याज दरामुळे सरकारचा दीर्घ मुदतीच्या कर्ज उभारणीकडे कल
2 पंतप्रधान कार्यालयाचा आदेश अन् निर्मला सीतारमन यांचा यु-टर्न… जाणून घ्या पडद्यामागे काय घडलं
3 ‘जीएसटी’ संकलन मार्चमध्ये विक्रमी १.२३ लाख कोटींवर
Just Now!
X