कोकण रेल्वेनेही आपल्या मार्गावर २१ ठिकाणी २७२ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी केली. यासाठी एक करोड सहा लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. रोहा ते दिघी बंदपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याचाही कोकण रेल्वेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे ३०० कोटी रुपये खर्च करून रोलिंग रेक्स बनविण्याचा कारखाना टाकला जाणार आहे. याशिवाय कोकण रेल्वे कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, मडगाव, कारवार अशा २१ स्थानकावर सीसीटीव्ही बसविले जाणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.