गेल्या १२ वर्षांतील कामांनंतरही शून्य फलित

मुंबई : रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रुळांखालील नाल्यांची सफाई करण्यासाठी पालिके तर्फे  रेल्वेला कोटय़वधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या मोऱ्या (कल्व्हर्ट) तुंबतातच आणि रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. त्यामुळे रेल्वेच्या मध्य, पश्चिम व हार्बर या तीनही मार्गावरील कल्व्हर्ट स्वच्छतेसाठी दिलेला हा निधी वायाच गेल्याचे दिसत आहे. गेल्या १२ वर्षांत पालिके ने रेल्वेला दिलेला ३० कोटींचा निधी असाच पाण्यात गेला असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालिके ची नालेसफाई ही जशी नेहमी टीके चा विषय ठरते तशीच रेल्वे रुळांखालील नाल्यांचे प्रवाह साफ करण्यावरून रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. हद्दीत पालिके च्या कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यास परवानगी नसल्यामुळे दरवर्षी रेल्वे रुळांखालील नाल्यांच्या प्रवाहांची स्वच्छता रेल्वेमार्फत के ली जाते. पालिका त्याकरिता रेल्वे प्रशासनाला निधी देत असते. प्रत्येक रेल्वे मार्गाला साधारण अडीच ते तीन कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो.

गेल्या १२ वर्षांत ३० कोटींहून अधिक रक्कम तीनही रेल्वे मार्गाच्या ११६ कलव्हर्टच्या स्वच्छतेसाठी देण्यात आले आहेत. मात्र मागील १२ वर्षांत रेल्वेला ३० कोटी देण्यात आले आहेत. मात्र, आजमितीस खर्च आणि कामांचे कोणत्याही प्रकारचे परीक्षण रेल्वेने किं वा पालिकेने के ल्याचे दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे सेवा कुर्ला आणि सायनदरम्यान ठप्प होते. मुंबईत बुधवारी झालेल्या पावसानेही काही तासांतच रेल्वे वाहतूक बंद करण्याची वेळ आली. अनिल गलगली यांना माहिती अधिकारांतर्गत खर्चाचे तपशील मिळाले आहेत.