News Flash

टाळेबंदीत गावी गेलेल्यांची शिधापत्रिका स्थगित

रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांची परवड

(संग्रहित छायाचित्र)

रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांची परवड

मुंबई : करोना संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत रोजगार गमावल्याने, तसेच संसर्गाच्या भीतीपोटी गावची वाट धरलेल्या अनेकांच्या शिधापत्रिका स्थगित करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर धान्याची भ्रांत निर्माण झाली आहे. दरम्यान, स्थगित के लेल्या शिधापत्रिका संबंधितांनी कागदपत्र सादर के ल्यानंतर पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरीही शिधावाटप दुकानचालकनागरिकांची अडवणूक करत असल्याच्या घटना मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत.

‘माझ्या पतीचे निधन झाल्याने मला गावी जावे लागले. आठ महिन्यांनी आल्यावर धान्य घ्यायला गेले तेव्हा शिधापत्रिका स्थगितझाल्याचे समजले. सहा महिन्यांनी हा प्रश्न सुटणार असे सांगून दुकानदाराने मला परत पाठवले. कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर असल्याने उपासमार होत आहे,’ अशी व्यथा कांदिवलीतील सुमन शर्मा यांनी मांडली.

चार महिने रेशन घेतले नाही तर शिधापत्रिका बंद होते असे दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुमच्याकडे गाडी आहे का, घरात काय काय उपकरणे आहेत असे प्रश्न विचारले जात आहेत. आजकाल सर्वसामान्यांच्या घरात निरनिराळी उपकरणे असतातच. त्यामुळे ती असतील तर शिधापत्रिका पुन्हा सुरू होणार नाही का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष नाईक यांनी उपस्थित के ला आहे.

प्रत्येक शिधावाटप दुकानात किमान ५० हून अधिक लाभार्थ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अधिक पैसे मोजून बाजारातून धान्य विकत घेणे शक्य असलेले लाभार्थी या संदर्भात फारशी कु रकु र करीत नाहीत. मात्र के वळ शिधावाटप दुकानातील धान्यावर पोटाची खळगी भरणारा मोठा वर्ग आहे. शिधावाटप पत्रिका स्थगित झालेल्या लाभार्थीना काही दुकानदार सहकार्य करीत आहेत; परंतु काही दुकानदार नागरिकांची बोळवण करीत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

शिधापत्रिका स्थगित होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आधार कार्ड जोडले नसल्यामुळे शिधापत्रिका स्थगित होऊ शकते. टाळेबंदीच्या काळात लोक गावी गेल्याने अनेक दुकानदारांनी गैरव्यवहार करून धान्य लुटले. त्यामुळे बऱ्याच शिधापत्रिका स्थगित करण्यात आल्या आहेत. अशी अडचण आल्यास लोकांनी शिधावाटप अधिकाऱ्याकडे अर्ज करावा. संबंधित कागदपत्रांची पूर्तता होताच शिधापत्रिका पुन्हा सुरू होईल.    

-कैलास पगारे, नियंत्रक, शिधावाटप, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:09 am

Web Title: ration card suspend of those who went to the village during lockdown zws 70
Next Stories
1 मिठाई दुकानदारांना यंदाही पाडवा कडूच!
2 एकरकमी शुल्कासाठी शाळांकडून अडवणूक सुरूच
3 १२ लाख शेतकऱ्यांकडून १,१६० कोटींचा वीजदेयकांचा भरणा
Just Now!
X