खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा; १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात अपयश

‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या पालिकेच्या मोहिमेत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तब्बल १५५ तक्रारदार बक्षिसाकरिता पात्र ठरले असले तरी त्यातील ३६ जणांनी बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे.

तक्रार केल्यानंतर २४ तासांत खड्डे भरून दाखवू असे आव्हान पालिकेने स्वीकारले होते. मात्र १५५ तक्रारदारांच्या तक्रारींचे निराकरण २४ तासांत करण्यात पालिकेला अपयश आले. परिणामी या तक्रारदारांशी संपर्क साधून बक्षिसाची रक्कम घेऊन जाण्याबाबत पालिकेकडून कळवले जात आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ३६ तक्रारदारांनी बक्षिसाची रक्कम घेण्यास नकार दिला आहे.

पालिकेने १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही मोहीम सुरू केली. माय ‘बीएमसी पॉटहोल फिक्सिट’ या मोबाइल अ‍ॅपवर तक्रार केल्यानंतर २४ तासांत खड्डा बुजवला नाही तर पाचशे रुपये अधिकारी किंवा कंत्राटदारांच्या खिशातून दिले जातील, अशी ही योजना होती. या योजनेअंर्तगत दीड हजाराहून अधिक तक्रारदारांनी खड्डय़ांच्या तक्रारी केल्या. त्यापैकी पालिकेच्या रस्त्यावर असलेल्या तक्रारींतील खड्डे बुजवण्यात आले. मात्र जे खड्डे २४ तासांनंतर बुजवले त्याच्या तक्रारदारांना पालिके ने ५०० रुपये द्यावेत म्हणून दबाव वाढू लागला होता. त्यानंतर सोमवारपासून पालिकेने तक्रारदारांना संपर्क साधून बक्षीस घेण्यासाठी बोलवायला सुरुवात केली.

२४ तासांनंतर खड्डे

  • बुजवले : १५५
  • ल्ल बक्षिसाची रक्कम
  • दिली : ७२ तक्रारदारांना
  •  बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला : ३६
  • संपर्क साधल्यानंतरही बक्षीस घेण्यास पुढे न आलेले : ३९
  •  खोटय़ा तक्रारी : ३
  •  प्रतिसाद दिला नाही : ६