News Flash

पवारांना विश्रांतीचा सल्ला

राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सलग दुस-या दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (शुक्रवार) रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

| November 22, 2013 03:49 am

राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सलग दुस-या दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (शुक्रवार) रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला असून येत्या रविवारी नाशिकमध्ये होणा-या विभागीय अधिवेशनाला पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच अलिकडच्या काळातील काही नियोजित दौरेही रद्द करण्यात आले आहेत.
काल (गुरूवार) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याला हजेरी लावण्याआधी पवारांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बॉंम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू तपासणीनंतर त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यानंतर तरूणींना मार्गदर्शन करण्यासाठी पवारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 3:49 am

Web Title: rest advised to pawar
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 पोलिसांचे आता कॉर्पोरेट खबरी
2 वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाचा गळा घोटण्याचे काम?
3 इंदु मिल जमीन हस्तांतरणासाठी मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी
Just Now!
X