मुंबईकडे येणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसच्या दोन डब्यांतील पाच प्रवाशांचे सामान लुटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. सोलापूर ते पुणे या स्थानकांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी ही लुट केली. लोणावळा स्थानकादरम्यान संबंधित प्रवाशांना जाग आल्यानंतर आपल्याकडील सामान चोरीला गेल्याचे समजले. या सर्व प्रवाशांनी दादर स्थानकात उतरून दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या लुटलेल्या सामानाची एकत्रित रक्कम साडेसहा लाख रुपये एवढी आहे.
चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसने गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोलापूर स्थानक सोडल्यानंतर ‘ए-१’ या वातानुकुलीत डब्यातील तीन प्रवाशांचे सामान लुटले गेले. यापैकी एका व्यक्तीकडील २ लाख ९३ हजार रुपयांचे सामान चोरीला गेले. यात २३ हजार रुपये रोख आणि उर्वरित रकमेचे सोने यांचा समावेश होता. तर एका महिलेकडील दोन लाख ६६ हजार रुपयांचे सामानही चोरीला गेले. याच डब्यातील आणखी एका व्यक्तीकडील ६३ हजार रुपयांच्या सामानाची लूट झाली. तर ‘एस-७’ डब्यातील दोन प्रवाशांकडून २६ हजार रुपयांचे सामान लुटण्यात आले. सोलापूर ते पुणे या दरम्यान झालेल्या या घटनेदरम्यान या पाचही प्रवाशांना गाढ झोप लागली होती. त्यामुळे लोणावळा स्थानकात जाग आल्यानंतर त्यांना आपल्याकडील सामान चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर दादरला उतरून या पाचही जणांनी दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दादर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सोपवला आहे.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा