परिचारिकांची मागणी, खासदारांकडूनही पाठपुरावा

मुंबई: पालघर, डहाणू येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेने डहाणू ते विरार आणि विरार ते डहाणू अशा अतिरिक्त दोन मेमू फे ऱ्या १६ जुलैपासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु डहाणू ते विरार मेमू ऐवजी डहाणू ते चर्चगेट लोकल चालवण्याची मागणी परिचारिकांनी के ली आहे. यासाठी खासदारांकडूनही पाठपुरावा केला जात आहे.

डहाणू, पालघर, बोईसर, वानगाव, सफाळे, वैतरणा यासह अन्य भागांतून कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय, बोरीवलीतील सावित्रीबाई फु ले रुग्णालय याशिवाय भगवती रुग्णालय, कू पर, मुंबईतील नायर, के ईएमसह अन्य रुग्णालयात जाणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. डहाणू येथून पहाटे ५ वाजता बोरीवलीला जाणारी मेमू लोकल बंद करून १ जुलैपासून पहाटे ५.४० वाजताची डहाणू ते विरार लोकल सुरू के ली. त्यामुळे अनेकांना विरार येथे उतरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागते. दुहेरी मनस्ताप होतानाच सकाळी ७ च्या पाळीलाही एक तास उशिराने वैद्यकीय कर्मचारी पोहोचत आहेत. त्यामुळे पहाटेची ५ वाजता डहाणू येथून चर्चगेटला जाण्यासाठी लोकल सुरू करण्याची मागणी होती.

परंतु पश्चिम रेल्वेने १६ जुलैपासून पहाटे ४.५० वाजताची डहाणू ते विरार मेमू लोकल फे री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सावित्रीबाई फु ले रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका सोनाली घरत यांनी पहाटे ४.५०ची मेमू चालवण्याला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र ती मेमूऐवजी डहाणू ते चर्चगेट लोकल चालवण्यात यावी. जेणेकरून मुंबईपर्यंत जाणाऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. हीच मागणी अगोदरपासून पश्चिम रेल्वेकडे के ल्याचे त्या म्हणाल्या. गुरुवारपासून विरार येथून डहाणूसाठीही रात्री १०.५५ वाजता मेमू सोडण्यात येणार आहे.

डहाणू ते बोरीवली पहाटे ५ च्या मेमूची वेळ बदलून त्याऐवजी ५.४० ची डहाणू ते विरार लोकल चालवली. त्यामुळे पालघर जिल्ह्य़ातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची गैरसोय झाल्याने या गाडीची पूर्वीचीच वेळ करण्याची मागणी होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेने पहाटे ४.५० ची मेमू चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विरापर्यंत मेमू ऐवजी त्यावेळेत डहाणू ते चर्चगेट लोकल चालवण्याची मागणी आहे.

-अरविंद सावंत, खासदार, शिवसेना</strong>