News Flash

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत ३५ लाखांची ‘बनवाबनवी’

सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत पुण्यातील एका महिलेने ३५ लाखांची 'बनवाबनवी' केल्याची घटना समोर आली आहे.

सचिन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पाचगणी येथील एका कार्यक्रमात अनघा बोरीकर आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत पुण्यातील एका महिलेने ३५ लाखांची ‘बनवाबनवी’ केल्याची घटना समोर आली आहे. अनघा बोरीकर असे नाव असलेल्या या महिलेने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत बीएमडब्ल्यू कंपनीची कार खरेदी करून देते, असे आमिष दाखवून सचिन आणि सुप्रिया यांच्याकडून पैसे उकळले आणि त्यानंतर ती फरार झाली. ‘दि एशियन एज’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
सचिन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पाचगणी येथील एका कार्यक्रमात अनघा बोरीकर आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या कार्यक्रमात सचिन यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अनघा बोरीकरने मी तुमची खूप मोठी चाहती असल्याचे सांगत सचिन यांच्याशी ओळख वाढवली होती. यावेळी अनघाने सचिन यांना स्वत:च्या कार विक्रीच्या व्यवसायाबद्दलही सांगितले होते. नामवंत ब्रँडसच्या महागड्या गाड्या कमी किंमतीत विकणाऱ्या अनेक वितरकांशी माझी ओळख आहे, असेही तिने सचिन यांना सांगितले होते.

दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनघा बोरीकरने त्यांच्याकडून मुंबईतील एका बीएमडब्ल्यू शोरूमच्या नावे २ लाख रूपयांचा धनादेश घेतला. तिने हा धनादेश देऊन संबंधित दुकानाच्या मालकाकडे गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी सचिन पिळगावकर यांच्या घरी पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार या दुकानदाराने दिवाळीत सचिन यांच्या घरी गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी पाठवून दिली. गाडी घरी आल्यामुळे अनघा बोरीकर यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बाजारभावापेक्षा कमी किंमतीत गाडी खरेदी करून दिल्याचा सचिन यांचा समज झाला. त्यामुळे सचिन यांनी व्यवहारातील उर्वरित ३५ लाख रूपयांची रक्कम अनघा यांनी देऊन टाकली. मात्र, दोन दिवसांतच दुकानातील एक कर्मचारी गाडी परत घेण्यासाठी घरी आला आणि आपण फसवले गेलो आहोत, हे सचिन यांच्या लक्षात आले. त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सचिन यांना गंडा घालणाऱ्या या महिलेचे नागपूरस्थित एका उद्योजकाशी लग्न झाले होते. मात्र, चार महिन्यांपूर्वीच दोघांचा घटफोस्ट झाल्यामुळे ती पुण्यात राहण्यासाठी आली होती.  पोलिसांनी समन्स जारी केल्यानंतर अनघा बोरीकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जदेखील केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने २६ नोव्हेंबर रोजी हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर अनघा बोरीकर फरार आहेत. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केलेले ३५ लाख रूपयेदेखील काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 7:48 am

Web Title: sachin pilgaonkar duped of rs 35 lakh by woman
टॅग : Fraud,Marathi Actors
Next Stories
1 धारावीतील रहिवाशांना ३५० चौरस फुटांचे मोफत घर
2 आमीरच्या वक्तव्यावर शत्रुघ्न सिन्हा नाराज
3 तेव्हा फडणवीस, आता बापट लक्ष्य
Just Now!
X