News Flash

सचिन वाझेंचं आणखी CCTV फुटेज आलं समोर; CSMT कडे जाताना कॅमेरात कैद

हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची हालचाल कॅमेऱ्यात कैद

सीएसएमटीकडे जाताना सचिन वाझे. सीसीटीव्हीत कैद झालेलं दृश्य.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केलेली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. ४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असतानाच्या वाझेंच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रातील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. त्यांच्या हत्येचा तपासही एनआयए करत असून, या प्रकरणी सचिन वाझे यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आलेली आहे. ५ मार्च रोजी हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे त्याअगोदर वाझेंच्या हालचालींचा शोध एनआयएकडून घेण्यात येत आहे.

Photos : सचिन वाझेंना घेऊन NIA ची टीम CSMT, कळवा स्थानकात

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील सीसीटीव्हीत सचिन वाझे यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी आढळला होता. त्यांच्या पूर्वसंध्येला म्हणजे ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता वाझे सीएसएमटीकडे जाताना दिसत आहेत. वाझे यांनी सीएसएमटीतून ठाण्याला जाणारी लोकल पकडली होती, असं तपासातून समोर आलं असून, एनआयएने वाझेंना सीन रिक्रिएट करण्यासाठी सीएसएमटीकडे आणलं होतं.

आणखी वाचा- दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

बनावट नावाने हॉटेलमध्ये मुक्काम

सचिन वाझे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करून एक रूम आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर ते खरं असल्याचं समोर आलं आहे. माहितीत तथ्य आढळले असून, सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असं स्पष्ट झालं. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिलाही दिसून आली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकीची याच महिलेच्या नावे नोंदणी होती, अशी माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 3:20 pm

Web Title: sachin vaze cctv footage vaze had taken a local train to thane from csmt bmh 90
Next Stories
1 ‘प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही’, नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन!
2 अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 करोना लसीकरणासाठी वयोमर्यादेचं बंधन नसावं : राज ठाकरे
Just Now!
X