अँटिलियाबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये नाव आल्यानंतर मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, गेल्या ९० दिवसांमध्ये एनआयएनं सचिन वाझे यांच्याविरोधात चार्जशीटच दाखल केलेली नाही. या मुद्द्याचा आधार घेऊन आता सचिन वाझे यांनी न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे सचिन वाझे यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर न्यायालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. अटकेनंतर सचिन वाझे यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. त्यापाठोपाठ नुकतीच एनआयएनं ईडीला देखील सचिन वाझे यांच्या चौकशीची परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी वाझे आणि अन्य दोन पोलिसांना बंगल्यावर बोलावले होते. तसेच त्यांना मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. या आरोपांच्या पाश्र्वाभूमीवर ‘ईडी’कडूनही देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. ‘ईडी’ने आतापर्यंत देशमुख यांच्या दोन स्वीय सचिवांना अटक केली आहे. वाझे यांनी एका बारमालकाकडून ४.७ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याची माहिती अटक आरोपींनी दिल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. तसेच हे दोन आरोपी आणि वाझे यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यासाठीच वाझेंच्या चौकशीसाठी परवानगी देण्याची मागणी ‘ईडी’ने केली होती. त्यानुसार, एनआयए विशेष न्यायालयाने ती परवानगी दिली होती.