बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सलमानला अटक झालेली मला बघायचे नाही, असे म्हणत या चाहत्याने न्यायालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोड पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याने चाहत्याच्या आत्महत्येचीबाब पोलिसांच्या त्वरित लक्षात आली आणि त्याला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, चाहत्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते.
सलमान खानला पुन्हा दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती
लोकप्रीयतेचे शिखर गाठलेल्या सलमान भोवती मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे वलय आहे. याआधी सत्र न्यायालयातील त्याच्या शिक्षेच्या सुनावणीवेळी देखील सलमानच्या राहत्या घराबाहेर चाहत्यांनी झुंबड उडाली होती. तसेच न्यायालयाबाहेर देखील अनेकांनी तोबा गर्दी केली होती. चाहत्यांसोबतच सलमानच्या विरोधात त्याच्या लोकप्रीयतेचा निकषाला दुर्लक्ष करून सलमानवर इतर दोषींप्रमाणेच कारवाई व्हावी अशा मागणीची निदर्शने करणाऱयांची गर्दी झाली आहे.