News Flash

सनातन संस्थेवर कारवाई केव्हा?

‘अंनिस’कडून दिल्लीत कारवाईची मागणी

संग्रहित छायाचित्र

‘अंनिस’कडून दिल्लीत कारवाईची मागणी

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा संशय असलेल्या सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती या संस्थावर कारवाई करण्यास का विलंब केला जात आहे, असा प्रश्न दिल्लीत आयोजित केलेल्या सभेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सरकारला करण्यात आला.

दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनाला अनुक्रमे ४२, २४ व १८ महिने पूर्ण झाले तरी सरकारी यंत्रणांनी संशयितांवर कारवाई केली नाही. या कारणासाठी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान देशभरात विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात १६ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:17 am

Web Title: sanatan sanstha
Next Stories
1 भिंतीचे  कान : डोळे आणि जीभ..
2 ज्ञानभांडाराचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
3 मूल्यांकन अहवालाआधीच गुन्ह्य़ासाठी संमती!
Just Now!
X