21 September 2020

News Flash

मालाडमधील ड्रग्ज विक्रीविरोधात शाळकरी मुलं रस्त्यावर

भाजपाकडून सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन

ड्रग्जविरोधी आंदोलन

मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात खुलेआम सुरू असलेल्या ड्रग्ज-नशेबाजीच्या विरोधात गुरूवारी अनेक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भाजपा रस्त्यावर उतरली. “ड्रग्ज माफियांच्या दहशतीने मालवणी परिसरातील मैदानांचा रोज संध्याकाळी समाजकंटक ताबा घेतात आणि तिथे खुलेआम नशेबाजीला प्रोत्साहन देणारे व्यवसाय केले जातात. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना खेळण्यासाठी तसंच नागरिकांना साधा फेरफटका मारण्यासाठीही मैदानं उपलब्ध होत नाहीत”, असा आरोप उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला. यावेळी, “स्थानिक ड्रग्जमाफियांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी” अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी सहायक पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना निवेदन देऊन केली.

ड्रग्जमाफियांविरोधात मालवणीतील म्हाडा लेआऊट ग्राऊंडजवळ गुरुवारी सकाळी भाजपाने निदर्शनं केली आणि निषेध मोर्चा आयोजित करून मालवणी पोलीस ठाण्याच्या जवळ निषेध सभा आयोजित केली होती. त्यात विविध शाळांचे 800 हून अधिक विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“नशेबाजीने मालवणी परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना नशेबाजीचं व्यसन लावलं आहे. अनेक कुटुंबं त्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि होतही आहेत. भविष्यात मालवणीतील युवा पिढी वाचवायची असेल तर या ड्रग्जमाफियांना आताच अटकाव करावा लागेल”, असं मत भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:15 pm

Web Title: school student fight against drug trafficking in malad bjp gave letter to assistant police commissioner jud 87
Next Stories
1 युतीबद्दल बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही; गिरीश महाजन यांचा रावतेंना टोला
2 उद्धव ठाकरे यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळेना : सचिन सावंत
3 पितृपक्षातले समाजभान
Just Now!
X