सागरी किनारपट्टी मार्ग (कोस्टल रोड) राज्य सरकार नाही, तर महापालिकाच स्वबळावर उभारणार, असा निर्धार व्यक्त करीत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी त्यासाठी महापालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्याचे  स्पष्ट केले.
सागरी किनारपट्टी मार्ग हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. शिवसेनेच्या निवडणूक वचननाम्यामध्ये सागरी किनारपट्टी मार्ग उभारण्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले आहे. पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सुबोध कुमार यांच्या हाती असताना २०११ मध्ये या प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी लागणारा निधी फंजीबल एफएसआयमधून उभारण्यात येईल, असे सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले होते.