राज्यातील पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी जारी केले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना बढतीही देण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे
१. प्रभात रंजन – पोलीस महासंचालक (विधी आणि तांत्रिक सहाय्य)
२. व्ही. डी. मिश्रा – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ
३. बी. के. सिंग – अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
४. एस. के. वर्मा – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा
५. के. के. सारंगल – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, विक्रीकर विभाग
६. विनय कारगांवकर – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई
७. के. एल. बिष्णोई – अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य व्यवस्थापक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ
८. हेमंत नागराळे – पोलीस आयुक्त, नवी मुंबई
९. अतुलचंद्र कुलकर्णी – अतिरिक्त पोलीस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक प्रमुख, मुंबई
१०. विवेक फणसळकर – अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
११. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन – अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई
१२. राजेंद्र सिंग – अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई
१३. प्रज्ञा सरवदे – अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई