सेंट झेविअर्स महाविद्यालयातील ‘मल्हार’ या महात्सवाची नांदी झाली असून १४ ऑगस्टपासून महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे ३५वे वर्ष आहे. ‘मल्हार २०१४- अ रेनेसा’ असे यंदाच्या तीन दिवसीय महोत्सवाचे नामकरण करण्यात आले आहे. विविध स्पर्धाच्या निकालावरून होणारे वाद टाळण्यासाठी यंदा प्रथमच निकाल स्पर्धा संपल्यानंतर एका तासाच्या आत सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.   यंदाच्या मल्हारचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मल्हारला थोडी ग्लॅमरची झळाळी मिळाणार आहे. यंदाच्या मल्हारच्या आयोजनासाठी सुमारे १,२०० हून अधिक विद्यार्थी मेहनत घेत असल्याची माहिती मल्हारची अध्यक्ष तान्या जेरी हिने दिली.