News Flash

‘शिंदेंनी महाराष्ट्राला लाज आणली’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दहशतवाद पोसत आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार प्रहार करीत शिंदे यांचा

| January 22, 2013 03:19 am

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दहशतवाद पोसत आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार प्रहार करीत शिंदे यांचा निषेध केला.
असे बेताल वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रास लाजेने मान खाली घालावयास लावले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली, तर भाजपवर हिंदू दहशतवादाचा आरोप करणाऱ्या शिंदे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करावीच, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी  दिले.
दहशतवादाला धर्म नसतो, पण शिंदे यांनी मात्र दहशतवादावर भगवा रंग चढविला, त्यामुळे मला त्यांची कीव येते, अशी खिल्लीही तावडे यांनी उडविली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवे चैतन्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला, तर राहुल यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला जनताभिमुख पक्ष बनविण्याच्या सोनिया गांधी यांच्या संकल्पास नवे बळ मिळेल, असे प्रदेश काँग्रेसचे संजय दत्त म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर मात्र संजय दत्त यांनी मौन पाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:19 am

Web Title: shinde makes to feel shy to maharashtra
टॅग : Maharashtra,Rss
Next Stories
1 फेरीवाला जैस्वालच्या मुलीचाही मृत्यू
2 १ एप्रिलपासून राज्यातील शाळांना वेतनेतर अनुदान
3 एमएमआरडीएच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘बोलाचीच कढी’!
Just Now!
X