शिवसेनेचे नेते जयवंत परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी २० जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. 
१९९२ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलींवेळी परब यांनी प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांची कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात परब यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने परब यांना जामीन मंजूर केला. परब यांच्या याचिकेवर २० जून रोजी सुनावणी होणार आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या न्यायालयात याविषयी सुनावणी झाली.
परब यांना न्यायदंडाधिकाऱयांनी जुलै २००८ मध्ये एक वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती सत्र न्यायालयाने दोन महिन्यांपर्यंत कमी केली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेचे कार्यकर्ते अशोक शिंदे यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.