भारतीय रेल्वेस्थानक विकास महामंडळाने देशातील पाच रेल्वे स्थानकांचा सावर्जनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्याची योजना हाती घेतली असून त्याअंतर्गत पुण्यातील शिवाजीनगर रेल्वेस्थानकाचा विकास होणार आहे. तर नागपूर रेल्वेस्थानकावर विशेष अतिथी कक्ष उभारण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकाचा विकास करताना तेथील वरच्या मजल्यांवरील जागेचा, स्थानकालगतच्या मोकळय़ा जागेचा व्यापारी वापर करण्यात येणार आहे. दिल्लीतील आनंदविहार, चंदीगड, भोपाळमधील हबीबगंज या रेल्वेस्थानकांसह महाराष्ट्रातील पुण्यातील शिवाजीनगर रेल्वेस्थानकाची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे.
तर ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून देशातील सात रेल्वेस्थानकांवर विशेष अतिथी कक्ष उभारण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. वायफाय सेवा, खानपान सेवा अशा सोयीसुविधा या आरामदायी कक्षात असतील.