01 December 2020

News Flash

ठाकूर विद्यामंदिरात शॉर्ट सर्किट

कांदिवलीच्या ठाकूर विद्यामंदिरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गोंधळ उडाला. यावेळी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू होता. आगीच्या अफवेने मोठी घबराट निर्माण झाली होती.

| February 10, 2013 02:31 am

कांदिवलीच्या ठाकूर विद्यामंदिरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गोंधळ उडाला. यावेळी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू होता. आगीच्या अफवेने मोठी घबराट निर्माण झाली होती.
ठाकूर विद्यामंदिरातील या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी मिळून तीन हजारजण उपस्थित होते. संध्याकाळी सातच्या सुमारास विद्युत रोषणाईच्या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडली.
त्यावेळी झालेल्या मोठय़ा आवाजाने शाळेत एकच घबराट पसरली. अग्निशमन दलाची एक गाडी, पाण्याचा टॅंकर आणि समता नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शाळेत दाखल झाले होते. त्या ठिकाणी केवळ शॉर्ट सर्किट झाल्याचे आढळून आल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. यावेळी कोणालाही इजा झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 2:31 am

Web Title: short circuit in thakur vidya mandir
Next Stories
1 मच्छिमारांचा संप मागे
2 रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा विनयभंग
3 ठाण्यात मुलीचा विनयभंग
Just Now!
X