रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी (सहायक पोलीस आयुक्त) फौजदारी दंड प्रक्रि या संहितेतील(सीआरपीसी) कलम १०८ अन्वये कार्यवाही सुरू करून भविष्यातील चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र का लिहून घेतले जाऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस जारी के ली.

त्यावरील सुनावणीसाठी १६ ऑक्टोबरला गोस्वामी यांना हजर राहाण्याची ताकीद देण्यात आली. पोलीस, वकील या प्रक्रि येला ‘चॅप्टर प्रोसीिडग’ संबोधतात. या माहितीस मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर हत्याकांड आणि वांद्रे स्थानकात स्थलांतरित श्रमिकांनी के लेली गर्दी, या विषयांवर रिपब्लिक वाहिनीवरील चर्चासत्रात गोस्वामी यांनी आक्षेपार्ह विधाने के ली होती. हे दोन्ही कार्यक्र म यूटय़ूबवर प्रक्षेपित करण्यात आले. तेव्हा प्रेक्षकांकडून जहाल प्रतिक्रि या दिल्या. त्याबाबत गोस्वामी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे नोंद करण्यात आले. गोस्वामी यांची कृती भिन्न धर्म, गटांत वितुष्ट निर्माण करणारी, एकात्मतेला तडा देणारी ठरते, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.