विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाविषयक जागृती करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

एसआयईएस शाळा आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश विज्ञान प्रदर्शनात इस्रोने आजवर के लेल्या कार्याचा आढावा आणि अवकाश विज्ञानात भारताने के लेली प्रगती यांचा चढता आलेख विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहे.

या प्रदर्शनात १७०हून अधिक शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून के वळ मुंबईतीलच नव्हे तर सूरतमधील शाळाही हजेरी लावणार आहेत. इस्रोविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि अवकाश विज्ञान जाणून घेता यावे या उद्देशाने घेण्यात आलेले हे प्रदर्शन माटुंगा (पू.) येथील एसआयईएस शाळेच्या सभागृहात १८ ते २० सप्टेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुले राहणार आहे.

विशेष म्हणजे आर्यभट्ट ते चांद्रयान-२ पर्यंतच्या मोहिमांची माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांकडून दिली जात आहे. त्यासाठी त्यांना इस्रोतर्फे  नेहरू विज्ञान कें द्रात प्रशिक्षण देण्यात आले. प्रदर्शनात आलेले विद्यार्थी अंतराळवीराचा पोशाख घालून छायाचित्र काढून घेत आहेत. तीनदिवसीय प्रदर्शनात साधारण पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी हजेरी लावतील, असा अंदाज शाळेकडून वर्तवण्यात आला.

प्रदर्शनात काय?

  • खगोलशास्त्र, अंतराळ, अवकाश विज्ञान, इस्रोचा जन्म, आजवरचा प्रवास या माहितीसोबतच पृथ्वी निरीक्षण, रॉकेटचे विविध प्रकार, स्टॅटिक पॅनल्स, प्रक्षेपण वाहने यांच्या प्रतिकृतीही यात पाहता येतील.
  • उपग्रह, संप्रेषण उपग्रह, अनुप्रयोग, आंतरग्रह अभियान, मानवी अंतराळ मोहिमा यांच्याही प्रतिकृती आणि माहिती अनुभवता येईल.
  • पृथ्वीपासून एखाद्या ग्रहावर पोहचण्याचा यानाचा प्रवास, त्याला लागणारे इंधन, त्यातील उपकरणे, वैज्ञानिक हालचाली याचे प्रात्यक्षिक दर्शन घडवणारे ‘प्रतिकृती यान’ या प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
  • एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही यान म्हणजे काय, मंगळ मोहीम कशी झाली, चांद्रयान एक व दोन मागील घडामोडी यांचे निरसन वैज्ञानिकांमार्फ त के ले जात आहे.
  • भविष्यात साकारल्या जाणाऱ्या ‘गगनयान‘ आणि ‘आदित्य’ या महत्वपूर्ण मोहिमांचाही आढावाही घेण्यात आला आहे.

समाजमाध्यमे आणि गेमिंगमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व कळावे म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सक्तीने चांद्रयान मोहीम पाहायला लावण्यात आली. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक वैज्ञानिक घडावे हा आमचा उद्देश आहे. – कल्याणी अरुमुगम, प्रचार्या, एसआयईएस शाळा