गुंतवणूकविषयक विशेष वार्षिक अंकाचे उद्या प्रकाशन

मुंबई : करोना-टाळेबंदीच्या संथ अर्थचक्रातून सावरताना नजीकच्या भविष्यातील आपल्या गुंतवणुकीचा पट कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या माध्यमातून बुधवारी उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञांच्या उपस्थितीत या गुंतवणूकपर मार्गदर्शन सत्राच्या निमित्ताने नव्या वित्त वर्षांतील आर्थिक नियोजनाची घडी बसवून देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा वार्षिकांकही उपलब्ध होणार आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सह-प्रायोजक असलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम येत्या बुधवारी, १० मार्चला सायंकाळी ६ वाजता होत आहे. गुंतवणूकदार-जागराचा कार्यक्रम हा दूरचित्र-संवाद माध्यमातून होणार आहे. या निमित्ताने गुंतवणूकदारांना सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे यावेळी मार्गदर्शन करतील. तसेच ‘मालमत्ता विभाजन’ संकल्पनेचा गुंतवणुकीत प्रत्यक्ष वापर करण्याबाबत गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. ‘लोकसत्ता’च्या अर्थसाक्षर उपक्रमातील ‘अर्थब्रह्म’चे यावेळी प्रकाशन होईल. नव्या वित्त वर्षांच्या अर्थसंकल्पानुरूप बदलते अर्थगणित व त्याचे उत्तर या विशेषांकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘मालमत्ता विभाजनातून संपत्ती निर्मितीचा यशमार्ग’ या ब्रीदवर आधारित या कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांकडून गुंतवणुकीच्या विविध पर्याय, विषयांवर मार्गदर्शन होईल. तसेच या उपक्रमात सहभागी गुंतवणूकदारांच्या अर्थ-नियोजनाविषयीच्या शंकांचे निरसन केले जाईल. करोना-टाळेबंदीतून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेनंतर आपले वित्तीय ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक उचलावयाच्या पावलांबाबत हा दूरचित्र-संवाद मार्गदर्शक ठरेल.

प्रायोजक : आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड.

सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड.

विषय : मालमत्ता विभाजनातून संपत्तिनिर्मितीचा यशमार्ग

सहभाग : तृप्ती राणे (सनदी लेखापाल आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार)

कधी : बुधवार, १० मार्च २०२१

वेळ : सायंकाळी ६ वाजता

सहभागासाठी   http://tiny.cc/LS_Arthabramha_10Mar येथे नोंदणी आवश्यक

(Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.)