News Flash

VIDEO: धक्कादायक ! सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

रस्सीखेच खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

रस्सीखेच खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्याविहार येथील के जे सोमय्या कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. कॉलेजमध्ये खेळ सुरु होते, यावेळी रस्सीखेच स्पर्धा ठेवण्यात आली होती. यादरम्यान हा प्रकार घडला. जीबीन सनी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. रस्सीखेच खेळ सुरु असतानाच अचानक जीबीन सनी बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

सोमय्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे निमित्त रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खेळासाठी दोन गट करण्यात आले होते. 22 वर्षीय जीबीन सनीदेखील या खेळात सहभागी झाला होता. व्हिडीओत जीबीन सनी सर्वात पुढे उभा असल्याचं दिसत आहे. पूर्ण जोर लावून तो रशी ओढताना दिसत आहे. जोर देण्यासाठी ती रशी तो गळ्याभोवती घेतानाही दिसतोय. उपस्थित विद्यार्थिही चिअर्स करताना दिसत आहेत. मात्र थोड्याच वेळात जिबीन सनी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो.

जीबीनी सनीला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. जीबीन सनी नर्सिंगचा विद्यार्थी होता अशी माहिती मिळत आहे. डिहायड्रेशन किंवा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला असून त्यानंतरच नेमकं कारण कळू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 2:53 pm

Web Title: student of somaiya college died while playing tug of war 2
Next Stories
1 कोस्टल रोडवरुन राज ठाकरे आक्रमक, कोळीवाड्यांना भेट देणार
2 सायनमध्ये १७ दुचाकी जाळल्या
3 शाळांमध्ये नाटय़शिक्षण सक्तीचे व्हावे – मनोज वाजपेयी
Just Now!
X