राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी परिणामकारक ठरू शकणारे र्सवकष धोरण तातडीने तयार करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी प्रशासनास दिले.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दोन जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षण करण्यात आले असून अन्य राज्यातही टप्याटप्याने हे काम करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी परिणामकारक धोरण तयार करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिल्या. राज्यातील १२  हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, यापुढे अनावश्यक खरेदीचे प्रकार बंद करावेत तसेच दर कराराने होणारी खरेदीही बंद करावी. त्यासाठी वित्त विभागाने खरेदीचे धोरण जाहीर करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.