News Flash

मुंबईत फोर्सवनमधील कमांडोची आत्महत्या

पोलिसांच्या फोर्सवन या विशेष दलामध्ये नियुक्तीला असलेल्या एका कमांडोने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

| April 26, 2013 11:20 am

पोलिसांच्या फोर्सवन या विशेष दलामध्ये नियुक्तीला असलेल्या एका कमांडोने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 
नंदलाल सुनावणी असे या कमांडोचे नाव आहे. स्वतःजवळील बंदुकीतून सोनावणे यांनी शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडली. सोनावणे हे कलिना येथील पोलिस वसाहतीमध्ये राहात होते. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकारी चौकशी करीत आहेत. येत्या १२ मे रोजी नंदलाल यांचे लग्न होणार होते, अशी माहिती मिळाली आहे. मुंबईवर २६/११च्या हल्ल्यानंतर फोर्सवन कमांडो दलाची स्थापना करण्यात आली होती.
(संग्रहित छायाचित्र) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 11:20 am

Web Title: suicide of a commando in force one in mumbai
Next Stories
1 संपकरी डॉक्टरांच्या अटकेचे आदेश
2 मुंबईची गरम ‘भट्टी’
3 मुंबईतील महाविद्यालयांना ‘धडा’ मराठवाडा पॅटर्नचा!
Just Now!
X