17 December 2017

News Flash

सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनील तटकरे हजर

सुनील तटकरे हे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात हजर झाले.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 21, 2015 6:18 AM

किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत.

रायगडमधील ६१४ कोटी रुपयांच्या कोंढाणे सिंचन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी जलसिंचनमंत्री सुनील तटकरे हे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात हजर झाले. ठाणे एसीबीच्या विशेष पथकाने त्यांची चौकशी केली. सुमारे तीन तास तटकरे यांची चौकशी करण्यात आली, असे ठाणे एसीबीचे अधीक्षक दत्ता कराळे यांनी सांगितले. याबाबत अधिक तपशील देण्यास नकार देण्यात आला.
कोकण जलसिंचन विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प जुलै २०११ मध्ये मंजूर करण्यात आला तेव्हा तटकरे जलसिंचनमंत्री होते. २२ जुलै रोजी या प्रकल्पाची मूळ किंमत ५६ कोटी होती, परंतु महिन्याभरात या प्रकल्पाची किंमत ३२० कोटी इतकी झाली. नंतर वर्षभरानंतर या प्रकल्पाचा खर्च वाढवून ६१४ कोटी इतका करण्यात आला. एफ ए इंटरप्राइझेसला कंत्राट देताना निविदांतील विविध अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आले. वन आणि पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. चौकशी करण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविण्यात आले होते. परंतु या दोघांनीही आपल्या प्रतिनिधींना पाठविले होते. काही मुद्दय़ांबाबत समाधान होत नसल्यामुळे पवार आणि तटकरे यांनी जातीने हजर राहावे, असे पत्र ठाणे एसीबीने दिले होते.

First Published on October 21, 2015 6:18 am

Web Title: sunil tatkare present in front of acb in irrigation scam