अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे रियावर मनी लाँड्रिंग प्ररकरणी गुन्हा दाखल झाला असून ईडीने तिची दोन वेळा चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान, रियाचे फोन कॉल्स डिटेल्स समोर आले. यात रियाने AU या व्यक्तीला जवळपास ६३ वेळा फोन केल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी रियाच्या टीमने AU ही व्यक्ती रियाची मैत्रीण असल्याचं म्हटलं आहे.

वाचा :  चक्रवर्ती कुटुंबाच्या अडचणीत वाढ?; ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले मोबाईल आणि लॅपटॉप

कोण आहे AU ?

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.

‘या’ व्यक्तींच्याही होती संपर्कात

रियाच्या फोन कॉल्स रेकॉर्डनुसार, तिने वर्षभरामध्ये वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी १ हजार १९२ वेळा फोन केला होता.

भाई शौविक चक्रवर्तीला १ हजार ६९ वेळा संपर्क केला.

रिया आणि तिची मॅनेजर श्रुती यांच्याच ७९१ वेळा फोन झाला होता.

रियाने आई संध्या चक्रवर्ती यांनी ५३७ वेळा फोन केला होता.

सिद्धार्थ पिठानी याच्यासोबत १०० वेळा फोन, तर दिपेश सावंतसोबत ४१ वेळा संपर्क झाला होता.