25 February 2021

News Flash

ठाण्यातील महिलेचा न्यूझिलंडमध्ये संशयास्पद मृत्यू

संबंधित महिला ही मूळची ठाण्यातील कोपरी येथील रहिवासी असून ती आपल्या पतीसोबत न्यूझिलंडमध्ये स्थायिक झाली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाण्यातील एका विवाहित महिलेचा न्यूझिलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एका समुद्रकिनारी तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला ही मूळची ठाण्यातील कोपरी येथील रहिवासी असून ती आपल्या पतीसोबत न्यूझिलंडमध्ये स्थायिक झाली होती. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

सोनम शेलार असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यांत तिचे सागर शेलार यांच्याशी लग्न झाले होते. सागर हे व्यवसायाने शेफ असून ते न्यूझिलंडमध्ये हॉटेल क्षेत्रात काम करतात. सोनमही सागर यांच्यासोबत न्युझिलंड येथे स्थायिक झाली होती. विशेष म्हणजे ती पाच महिन्यांची गरोदर होती.

सोनम बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती सागर यांनी वेलिंग्टन पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर न्यूझिलंडमधील वैरारापा बीचवर सुरक्षा रक्षकांना तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे हा अपघाती मृत्यू आहे की, घातपात याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

वेलिंग्टन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून सर्व बाजू तपासल्या जात आहेत. सोनम बीचवर कशी गेली, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, सोनमचे कॉल डिटेल्स, तिच्या घरचा परिसर, बीचचा परिसर यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच सोनम आपल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिल्यानंतर नाराज असल्याचे तिच्या नातेवाईंकाकडून कळते. त्यामुळे पोलीस सर्व बाबींचा विचार करुन तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 9:28 am

Web Title: suspected death of thane based woman in new zealand
Next Stories
1 वर्सोवा खाडी पूल दुरुस्तीसाठी आजपासून वाहतूक बदल
2 ‘बुलेट’ रेल्वेसाठी रस्तेही प्रशस्त
3 ‘मोसमी छत’वाल्यांचे धाबे दणाणले!
Just Now!
X