News Flash

मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या गुंडांना आवरावं – बाळा नांदगावकर

पनवेलमध्ये मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर भाजपाच्या नगरसेवकाकडून जीवघेणा हल्ला झाला होता.

मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या गुंडांना आवरावे, अन्यथा मोठया संघर्षाची परिस्थीती निर्माण होईल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.


पनवेलमध्ये मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर भाजपाच्या नगरसेवकाकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नांदगावकर यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

Next Stories
1 नवी मुंबईत रहिवासी इमारतीला आग, अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल
2 राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, उच्च न्यायालयात याचिका
3 माळशिरसचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत डोळस यांचे निधन
Just Now!
X