प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी बसमध्ये आगारप्रमुख व विभागप्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जाणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिले आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

दररोज एसटीने सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास किंवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. ग्राहकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायीत्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे निर्देशात म्हटले आहे. त्यामुळेच एसटी बसमध्ये आगार प्रमुख व विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.