News Flash

मुंबईतील तापमानात वाढ

पुढील दोन दिवसात मुंबईचे तापमान २ अंशाने कमी अधिक होत राहील.

(संग्रहित छायाचित्र)

दोन दिवसात मुंबई आणि परिसरातील किमान आणि कमाल तापमानात सुमारे ५ अंशांची वाढ झाली. त्यामुळे शनिवारी मुंबईतील थंडी एकदम कमी झाली.

गुरुवारच्या किमान तापमानात पाच अंशाने वाढ होऊ न ते २१.५ अंशावर, कमाल तापमनात ५ अंशाने वाढ होऊन ३४ अंशावर पोहचले. पुढील दोन दिवसात मुंबईचे तापमान २ अंशाने कमी अधिक होत राहील.

शनिवारी मध्य महाराष्ट्रात देखील किमान तापमानात वाढ झाली. जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान १३ ते १९ अंश दरम्यान नोंदविण्यात आले. विदर्भात मात्र तापमान घाट होऊन किमान तापमान ६ ते १० अंश होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:29 am

Web Title: temperatures rise in mumbai abn 97
Next Stories
1 अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य शाळांना देणे गरजेचे!
2 ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारा ‘माणदेशी महोत्सव’
3 मुद्रांक शुल्कात लवकरच वाढ
Just Now!
X