25 April 2019

News Flash

टीईटी आणि नेट एकाच दिवशी

उमेदवारांना एका परीक्षेची संधी गमवावी लागणार

संग्रहित फोटो

उमेदवारांना एका परीक्षेची संधी गमवावी लागणार

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) एकाच दिवशी होत असल्यामुळे उमेदवारांचा गोंधळ झाला आहे. हजारो उमेदवारांना दोन्हींपैकी एक संधी गमवावी लागणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक होण्यासाठी किंवा कनिष्ठ संशोधक म्हणून काम करण्यासाठी नेटमध्ये पात्र होणे आवश्यक असते. यंदा या दोन्ही परीक्षा ८ जुलै रोजी होणार आहेत. दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेले हजारो उमेदवार या दोन्ही परीक्षा देतात. मात्र यंदा या परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे उमेदवारांना दोन्हींपैकी एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर टीईटीची तारीख बदलण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

First Published on May 14, 2018 1:17 am

Web Title: tet and net exam at same time