डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहान असताना मुंबईत आले ते आता जिथं वन इंडिया बुल्स आहे तिच्या बाजुला त्यावेळी असलेल्या दबक चाळीमध्ये. नंतर ते परळला बीआयटी चाळीत रहायला आले.

प्लेगपासून धडा शिकलेल्या ब्रिटिशांनी स्वच्छ व नियोजित मुंबई शहराची रचना केली त्यामुळे बीआयटी चाळीसारख्या इमारती उभ्या राहिल्या. ज्यामुळे गरीबांनाही साफ स्वच्छ परीसरात रहायची सोय झाली. बाबासाहेबांनीही नियोजित भागात, रोगराईमुक्त परीसरात जवळपास दोन अडीच दशकांचा काळ व्यतित केला.

परळमधल्या दामोदर सभागृहात बहिष्कृत हितकारिणी सभेची पहिली सभा झाली. संघटितपणे व मोठ्या प्रमाणावर दलितांसाठी कार्य बाबासाहेबांनी सुरू केलं ते परळमध्ये. वाईटातून चांगलं घडतं ते असं… प्लेगच्या कोपानंतर ब्रिटिशांनी शहर नियोजन केलं परिणामी बीआयटी चाळी, बीडीडी चाळी उभ्या राहिल्या आणि गरीबांनाही रोगराईमुक्त जीवन जगता आलं. कदाचित अनेक परळकरांनाही माहित नसेल ते राहतात त्या भागातून बाबासाहेबांच्या दलित चळवळीची सुरूवात झाली आणि त्याला एवढी सगळी पार्श्वभूमी आहे… सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…