भायखळा येथे जावेला मुलगी नसल्याने तिच्यासाठी एका महिलेने ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून सकिना उमर (वय २९) आणि फातिमा उमर (वय ३९) अशी या महिलांची नावे आहेत.

भायखळा परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेच्या ३ वर्षांच्या मुलीचे १६ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले. स्टेशन परिसरातून तिचे अपहरण झाल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी कल्याण, भायखळा ते अगदी पुणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात अपहरण झालेली ३ वर्षांची मुलगी एका तरुणासोबत भायखळा स्टेशन परिसरात दिसली. यानंतर काही वेळाने तिथे एक महिला बॅगेसह आली. तिने तरुणाकडून मुलीला घेतले आणि पुण्याला जाणारी ट्रेन पकडल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. पोलिसांची एक टीम पुण्यातही गेली. मात्र, कोणतीची ठोस माहिती मिळाली नाही.

nagpur, truck driver kidnapped minor girl, police, solved case
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

शेवटी पोलिसांनी पुन्हा एकदा भायखळा स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पोलिसांना सकिना ही पीसीओवरुन कॉल करताना दिसली. पोलिसांनी शेवटी पीसीओवरील कॉल डेटा तपासला असता हैदराबादमधील महिलेला त्यावेळी फोन केल्याचे समोर आले. पोलिसांच्या पथकाने तातडीने हैदराबादमधील त्या क्रमांकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पत्ता हाती येताच पोलिसांचे पथक हैदराबादला पोहोचले आणि त्यांनी फातिमाच्या घरी धडक दिली. फातिमाच्या घरातच अपहरण झालेली चिमुकली होती. पोलिसांनी फातिमाला भायखळा येथे आणले आणि तिची कसून चौकशी केली. चौकशीत तिने सकिनाचा पुण्यातील पत्ता सांगितला. या आधारे पोलिसांनी सकिनालाही अटक केली. अपहरण झालेल्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. फातिमाला मुलगी नसल्यानेच अपहरण केल्याची कबुली सकिनाने दिली.