News Flash

‘दादा’, ‘पवार’, ‘राज’कडे वाहतूक पोलिसांचे लक्ष

फॅन्सी क्रमांकपाटी असलेल्या वाहनांवर धडक कारवाई करून दंडवसुली

अवैधरीत्या वाहने उभी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतल्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी फॅन्सी क्रमांकपाटी (नंबरप्लेट) असलेल्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अवैधरीत्या वाहने उभी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतल्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी फॅन्सी क्रमांकपाटी (नंबरप्लेट) असलेल्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर, उपनगरांत वाहनांच्या नंबरप्लेटची तपासणी सुरू केली असून नियम धुडकावणाऱ्यांना दंड के ला जात आहे.

मोटर वाहन नियमांत वाहनांची नंबरप्लेट कशी असावी हे निश्चित करण्यात आले आहे. आकडे, मूळाक्षरे आदींचे आकारही त्यात नमूद आहेत. त्यामुळे आकार किं वा ठेवणीत थोडा जरी बदल आढळल्यास संबंधित वाहन दंडास पात्र ठरू शकते. वाहतूक पोलिसांनी नियमांनुसार नसलेली वाहने शोधून त्यावर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आकडय़ांची मोडतोड करून ‘नाना’, ‘दादा’, ‘भाई’ आदी शब्द तयार के लेल्या क्रमांकपाटय़ांवरील आकडय़ांचा आकार लहान असल्यास किं वा एखाद्या आकडय़ाचा आकार अन्य आकडय़ांपेक्षा लहान किं वा मोठा करून घेतलेल्या क्रमांकपाटय़ा कारवाईस पात्र ठरत आहेत. अशा वाहनचालकांना एक हजार रुपयांचा दंड वसूल के ला जात आहे.

शहरातील महत्त्वाच्या चौकांत, महत्त्वाच्या मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅ मेऱ्यांआधारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना चलान पाठवले जाते. तसेच कर्तव्यावरील अधिकारी, अंमलदारांकरवी घेतलेल्या छायाचित्रांआधारेही चलान बजावले जाते. या दोन्ही कृ तींमध्ये नंबरप्लेटवरील तपशील स्पष्ट दिसल्यास चलान पाठवले जाऊ शकते. तपशील अवलोकनात किं चित फरक पडल्यास चलान भलत्याच व्यक्तीला जाऊ शकते. त्यामुळे सर्व वाहनांच्या नंबरप्लेट निश्चित प्रमाणात असाव्यात या उद्देशाने ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयातून सांगण्यात आले.

संभ्रम होतो..

लहानमोठय़ा आकडय़ांच्या नंबरप्लेटचा वापर प्रामुख्याने संभ्रम निर्माण करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ चार आकडय़ांपैकी पहिला, अखेरचा आकडा इतका लहान ठेवायचा की तीन आकडी नंबरप्लेट आहे की काय, असे भासावे. अशा नंबरप्लेट एका नजरेत लक्षात येत नाहीत. तसेच सीसीटीव्हींनी कै द के लेल्या चित्रणावरूनही अनेकदा अशा नंबरप्लेटचा बोध होत नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणारी आणि गुन्ह्य़ांत वापर होणारी वाहने नजरेतून निसटू शकतात, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 1:25 am

Web Title: traffic police take action on fancy number plate dd70
Next Stories
1 अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत
2 पालिका मुख्यालयात भाजपचे आंदोलन
3 पाण्यासाठी ७००, तर शौचालयासाठी २७० रुपये
Just Now!
X