दंड भरल्यानंतरही वाहन सोडवून घेताना दमछाक

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : रस्त्यावर अवैधरीत्या उभ्या केलेल्या वाहनांना लावलेला ‘चाप’ लावण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली असली तरी दंड भरून पोलिसांनी लावलेल्या ‘चापा’तून (क्लॅम्प) वाहन मोकळे करून घेताना चालकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. यावरून चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादही उद्भवत आहेत.

वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी पदभार स्वीकारल्यापासून रस्त्याकडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याच्या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी जप्तीची कारवाई हाती घेतली. शहरातील सर्व वाहतूक चौक्यांना आपापल्या हद्दीत सतत गस्त घालून नो पार्किंग परिसरात उभी के लेली वाहने जप्त करण्याचे आदेश यादव यांनी सोडले. गस्त आणि वाहने जप्त करण्यासाठी विशेष पथके  तयार करण्यात आली. जास्तीत जास्त वाहने जप्त करता यावीत यासाठी अतिरिक्त टोइंग व्हॅन आणि क्लॅम्प(वाहन जागच्या जागी खिळवून ठेवण्यासाठी उपयोगात येणारा चाप) उपलब्ध करून दिले. चाप लावलेल्या वाहनांवर संबंधित वाहतूक चौकी, अंमलदार आणि अधिकाऱ्याचा मोबाइल क्र मांक लिहिलेली चिठ्ठी अडकवली जाते. या क्र मांकावर चालक/मालकाने संपर्क साधल्यास अंमलदार येतात, दंड वसूल करतात आणि चाप मोकळा करतात. पण, वाहतूक पोलीस मुख्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रोरींनुसार चाप मोकळा करण्यासाठी संपर्क साधल्यावर पोलीस बऱ्याच वेळाने तेथे येतात. तोवर चालक/मालकाला तेथे ताटकळत उभे राहावे लागते. काही प्रकरणांमध्ये वाहनाला लावलेला चाप मोकळा करण्यासाठी तीन तासांहून अधिक विलंब झाला आहे.

रघुवीर कु ल यांनी लोकसत्ताला त्यांचा अनुभव सांगितला. पाच मिनिटांच्या फरकाने ते कारजवळ आले तोवर वाहतूक पोलीस चाप लावून निघून गेले होते. पोलिसांनी मागे सोडलेल्या चिठ्ठीतील मोबाइल क्र मांकावर त्यांनी संपर्क साधला. मात्र तोवर संबंधित अंमलदार विलेपार्ले येथून वाकोलातील वाहतूक चौकीत आला होता. तो अंमलदार वाकोलाहून पाल्र्यात येईपर्यंत बरेच तास गेले. या दरम्यान अन्य अंमलदार तेथे आला. त्याने त्याच्याकडील चावीने चाप मोकळा करण्याचा प्रयत्न के ला. मात्र चाप उघडला नाही. यात कुल यांचा वेळ खर्ची झाला.

याबाबत वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त नंदकु मार ठाकू र यांच्याशी संपर्क साधला असता अपुरे मनुष्यबळ, जेवणाची सुटी, पाळी बदलण्याची वेळ, वाहतूक कोंडी किं वा अन्य ठिकाणी वाहतूक नियमनासाठीचा बंदोबस्त या कारणांमुळेही विलंब होऊ शकतो, असे ते म्हणाले. नियम मोडणाऱ्या, बेशिस्त चालकांच्या सोयीसाठी पोलिसांना नेमून दिलेले कर्तव्य टाळता येणार नाही. दिवाळीपासून वाहनजप्तीची कारवाई आक्र मकरीत्या शहर, उपनगरांत सुरू आहे. दर दिवशी दीडशे ते दोनशे वाहने चाप लावून जप्त के ली जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

जप्तीतून दंडाची थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न

ई चलन प्रणालीमुळे बेशिस्त चालक नियमभंगाबाबतचा दंड आपल्या सवडीने भरू शकतात. सध्या हाती घेण्यात आलेल्या वाहन जप्तीच्या कारवाईतून दंडाची थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्नही वाहतूक पोलिसांनी आरंभला आहे. जप्त वाहनाची थकबाकी पाहिली जाते. सर्व थकबाकी भरण्याचे आवाहन चालक/मालकाला के ले जाते. शक्य नसल्यास किमान तीन दंडांची रक्कम वाहतूक पोलीस संबंधितांकडून भरून घेतात.

कारवाईबाबत येणाऱ्या तक्रोरीचे निरसन के ले जाते. तक्रोरी येऊ नयेत, जप्त के लेली वाहने सोडविण्यात विलंब होऊ नये यासाठीही उपाययोजना के ली जाईल. मात्र जोवर नो पार्किंगमध्ये वाहने उभी राहतील तोवर ही कारवाई सुरूच राहील.

– नंदकुमार ठाकूर,

उपायुक्त, वाहतूक पोलीस

दंड थकविणारी वाहने जप्त

जास्त रकमेचा दंड शिल्लक असलेल्या वाहनांचा शोध घेऊन संबंधित वाहन जप्त करण्याची मोहीम येत्या काही दिवसांत हाती घेतली जाणार आहे, असे वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.