News Flash

आदिवासी आमदार धनगर आरक्षणाविरोधात

धनगर समाजाचा अनुसू्चित जमातीत समावेश करून आरक्षण देण्यास सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी तीव्र विरोध केला आहे.

| August 2, 2015 04:59 am

धनगर समाजाचा अनुसू्चित जमातीत समावेश करून आरक्षण देण्यास सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी तीव्र विरोध  केला आहे. या प्रश्नावर पक्षभेद बाजूला ठेवून आदिवासी आमदार मित्रमंडळ या नावाने एक संघटना स्थापन करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना आरक्षण देण्यास विरोध असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ आदिवासी आमदार के.सी.पाडवी यांनी ही माहिती दिली. आदिवासी आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भविष्यात भाजप सरकारपुढे राजकीय पेच निर्माण होणार आहे.

धनगर समाजाच्या नेत्यांची या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी असली, तरी ती मान्य करणे शक्य होणार नाही, याची सत्ताधारी व विरोधी पक्षांनाही कल्पना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 4:59 am

Web Title: tribal mla quite
टॅग : Mla
Next Stories
1 मंत्रिमंडळाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची सर्वाधिक दांडी
2 चिक्की प्रकरणाची चौकशी लांबण्याची शक्यता
3 याकूबच्या पत्नीस खासदार करण्याची मागणी करणाऱ्या सप नेत्याची हकालपट्टी
Just Now!
X