25 November 2020

News Flash

तीनपैकी दोन माजी पोलीस अधिकारी पराभूत

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आयएएस अधिकारी अपराजिता सरंगी यांनी पटनायक यांचा पराभव केला.

डॉ. सत्यपाल सिंग विजयी, अरुप पटनायक पराभूत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांपैकी डॉ. सत्यपाल सिंग पुन्हा विजयी झाले तर ओडिशातून निवडणूक लढविणारे अरुप पटनायक यांचा पराभव झाला. ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे अयशस्वी ठरले.

डॉ. सिंग आणि अरुप पटनायक हे मुंबईचे दोन माजी पोलीस आयुक्त, तर अतिरिक्त महासंचालकपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे तीन पोलीस सेवेतील अधिकारी  रिंगणात होते.  डॉ.  सिंग उत्तर प्रदेशातील बागपत मधून लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून बिजू जनता दलातर्फे  निवडणूक लढविलेले माजी पोलीस आयुक्त पटनायक यांचा २३ हजार ८३९ मतांनी पराभव झाला. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आयएएस अधिकारी अपराजिता सरंगी यांनी पटनायक यांचा पराभव केला.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून जनसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढविलेले ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त  लक्ष्मीनारायण  तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आणि काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये रामटेकमधून पराभूत झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 4:02 am

Web Title: two of the three former police officers lost in lok sabha election
Next Stories
1 ३१ विधानसभा मतदारसंघांत युतीचे मताधिक्य
2 तीन हजार मच्छीमारांवर संकट
3 मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्ग
Just Now!
X