मुंबईत करोनाची लागण झाल्याने दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना करोनाची लागण झाली होती. या दोघांचीही करोनाशी सुरु असलेली झुंज संपली आहे. या दोघांमध्ये एक शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर दुसरे सायन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या दोघांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर या दोघांची प्राणज्योत मालवली.
Mumbai Police’s ASI Murlidhar Waghmare (Sewri police station) & PN Bhagwan Parte (Shivaji Nagar police station) have passed away due to #Coronavirus. pic.twitter.com/gHErwzMleW
— ANI (@ANI) May 14, 2020
दरम्यान राज्यभरात एक हजार पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. ८५१ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ८ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशात आता मुंबईत आणखी दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 8:19 pm