News Flash

क्रेन उलटल्याने दोन कामगार जखमी

वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंचाचे सामान उचरणारी क्रेन पलटी झाल्याने दोन कामगार जखमी झाले.

| September 2, 2013 03:30 am

वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंचाचे सामान उचरणारी क्रेन पलटी झाल्याने दोन कामगार जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.
या मैदानात संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवाचा सेट उभारला होता. त्यातील सामान क्रेनने हलविण्यात येते होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक क्रेन उलटल्याने बिलाल आणि कमाल हे दोन कामगार त्या खाली सापडून जखमी झाले. त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर एकच गोंधळ झाला आणि कार्यकर्ते जमा झाले होते. वरळी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीनंतर ठेकेदार दोषी असल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे वरळी पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 3:30 am

Web Title: two workers gets heart in crain crash accident
Next Stories
1 पाणी प्रकल्पांसाठी जागतिक बँकेला साकडे ?
2 नोटांची बंडले, विदेशी मद्याची रेलचेल..
3 ‘सफाई कामे करणाऱ्या’ सफाई कामगारांचे बंड
Just Now!
X