News Flash

लघुउद्योगांवर विचारमंथन

‘केसरी प्रस्तुत व ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ या परिषदेचे सहप्रायोजक आहेत.

‘केसरी’ प्रस्तुत या उपक्रमाचे ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ सहप्रायोजक आहेत.

‘लोकसत्ता – बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाच्या नव्या पर्वाचे विक्रम लिमये यांच्याहस्ते उद्घाटन

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा राखणाऱ्या मात्र काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या अशा लघुउद्योगाचा सर्वंकष आढावा  ‘लोकसत्ता : बदलता महाराष्ट्र’ उपक्रमातून घेतला जाणार आहे. या नव्या पर्वाची सुरुवात येत्या सोमवारपासून होत असून यानिमित्ताने ‘लघुउद्योगाची क्षमता आणि आव्हाने’ या विषयावर तज्ज्ञ, मान्यवरांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस विचारमंथन होणार आहे. ‘केसरी प्रस्तुत व ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ या परिषदेचे सहप्रायोजक आहेत. ही परिषद येत्या ११ व १२ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. परिषदेचे उद्घाटन ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज-एनएसई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये हे करणार आहेत. तर परिषदेचा समारोप ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्शिअल होल्डिंग्ज’चे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

लघुउद्योगाला भेडसावणाऱ्या वित्तपुरवठय़ाच्या समस्येवर कसा मार्ग काढता येईल व त्यासाठी स्रोत कसे उपलब्ध करून घेता येईल, या विषयावरील चर्चासत्राने ही परिषद सुरू होईल. त्याचबरोबर उत्पादन व बाजारपेठ, कुशल रोजगार व तंत्रज्ञानाची उपलब्धतता, लघुउद्योगासाठीच्या विविध योजना, लघुउद्योगांसाठीची नियमावली आदी विषयांनाही यानिमित्ताने संबंधित क्षेत्रातील, विषयातील तज्ज्ञांमार्फत हात घातला जाईल. लघुउद्योजकांसाठी धडा ठरणारा उद्योगप्रवास या वेळी यशस्वी उद्योजकांकडून उलगडला जाईल.

वित्तपुरवठा समस्या व स्रोत

सहभाग : अभय बोंगिरवार (कार्यकारी संचालक, आयडीबीआय बँक), कुसुम बाळसराफ (प्रकल्प महाव्यवस्थापिका, माविम), डॉ. विश्वास पानसे (एनपीए सल्लागार)

नाममुद्रा, बौद्धिक संपदा, बाजारपेठ

सहभाग : प्रा. डॉ. मृदुला बेळे (बौद्धिक संपदा व पेटंट सल्लागार), मीनल मोहाडीकर (उपाध्यक्षा, एमईडीसी)

कुशल रोजगार व तंत्रज्ञान उपलब्धता

सहभाग : दीपक कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण), हेमंत देशपांडे (कौशल्य विकास मार्गदर्शक), घनश्याम सोमण (प्राचार्य, डॉन बॉस्को मेरिटाइम अकादमी)

प्रोत्साहनपूरक  योजना व उद्योगानुकूलता

सहभाग : संजय सेठी (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी), डॉ. प्रदीप बावडेकर (व्यवस्थापकीय संचालक, मिटकॉन), समीर जोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट)

नियमावली : बंधन की व्यवसाय सुलभता

सहभाग : सचिन म्हात्रे (उपाध्यक्ष, विदेश व्यापार समिती – टिसा), मोहन गुरनानी (अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र), रवींद्र सोनावणे (अध्यक्ष, लघुउद्योग भारती – महाराष्ट्र)

छोटे ते मोठे उद्योग – वाढीचे संक्रमण

सहभाग : प्रमोद चौधरी (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर), शंतनू भडकमकर (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स)

‘केसरी’ प्रस्तुत या उपक्रमाचे ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ सहप्रायोजक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2017 4:36 am

Web Title: vikram limaye to inaugurate loksatta badalta maharashtra event
Next Stories
1 ठाण्यातील मंडळाला ‘मुंबईच्या राजा’चा मान
2 ‘त्या’ तेरा वर्षीय मुलीची प्रसुती
3 मोनाली अवसरमल आणि विहंग लावंड ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X