News Flash

येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

शहरातील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

येत्या चोवीस तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर शहरातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

येत्या चोवीस तासात शहरातील कमाल तापमान २७ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात साधारण हवामान राहणार असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात हवेचा वेग ताशी ५० ते ६० किमी इतका असणार आहे. या काळात मच्छिमारांनी खोल समुद्रात जाण्याचे धाडस करु नये असा इशाराही कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 6:17 pm

Web Title: warning of torrential rain in mumbai in next 24 hours aau 85
टॅग : Monsoon
Next Stories
1 राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार, नव्या कार्यपद्धतीवर काम सुरु – मुख्यमंत्री
2 कोकण विभागात अतिवृष्टी, ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस
3 या अडचणीच्या काळात कामगार कपात करु नका; मुख्यमंत्र्याचं व्यवस्थापनांना आवाहन
Just Now!
X