News Flash

धक्कादायक! बांद्रयामध्ये हाऊसिंग सोसायटीच्या वॉचमनने ५२ वर्षीय महिलेवर केला बलात्कार

बांद्रयामध्ये एका हाऊसिंग सोसायटीच्या वॉचमनने त्याच इमारतीत राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बांद्रयामध्ये एका हाऊसिंग सोसायटीच्या वॉचमनने त्याच इमारतीत राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला शनिवारी रात्री घरात एकटी असताना ही घटना घडली. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. राम अचीवार (४०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेची मुलगी घरी आली त्यावेळी तिने आरोपी राम अचीवारला घरातून बाहेर पडताना पाहिले.

तिने त्याला प्रश्न विचारताच रामने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ज्यावेळी तिला रामने तिच्या आईवर बलात्कार केल्याचे समजले तेव्हा तिने इमारतीमधील अन्य रहिवाशांच्या मदतीने त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. अत्यंत क्षुल्लक गोष्टीचे निमित्त करुन आरोपी राम अचीवार पीडित महिलेच्या घरी गेला होता.

तीन महिन्यांपूर्वी तो या हाऊसिंग सोसायटीमध्ये नोकरीला राहिला होता. त्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला होता व संबंधित महिला घरी एकटी असताना अनेकदा तो तिच्या घरी जायचा. पोलिसांनी कलम ३७६ अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 2:55 pm

Web Title: watchman arrested for raping on 52 year old
टॅग : Bandra
Next Stories
1 आमदार अनिल बोंडे, राहुल कुल, अनिल परब, भाई गिरकर उत्कृष्ट संसदपटू
2 प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकराने घरात घुसून केले वार, पुण्यातील धक्कादायक घटना
3 डीएसकेंचा घोटाळा २ हजार कोटींचा; न्यायालयात आरोपपत्र दाखल
Just Now!
X