महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता‘च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या उपक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वेबसंवादाने गुरुवारी होईल. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवादात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुशीलकु मार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आणि राज्यासमोरील प्रश्नांचा उहापोह केला होता. गुरुवारी होणाऱ्या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपली भूमिका मांडणार आहेत. ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास गुरुवारी सहा महिने पूर्ण होत आहेत.

सहभागी होण्यासाठी..

या वेबसंवादात भाग घेण्यासाठी वाचकांना  http://tiny.cc/LS_Sathicha_Gazal_28May या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.

प्रायोजक..

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन’ (एमआयडीसी) आहे. उपक्रमाचे सहसंयोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदानी ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लि. आहे. तर कार्यक्रम पॉवर्डबाय दामजी शामजी शहा ग्रुप आहे.