तांत्रिक बिघाड झाल्याने  पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी साडे सहावाजेच्या सुमारास महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान बाहेरून जाणारी एक केबल पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे संपूर्ण मार्गाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.परिणामी चारही लाईनवरील वाहतूक थांबण्यात आली होती.

यामुळे संध्याकाळी कामावरून घराकडे निघालेल्या नोकरदारांचा चांगलाच खोळंबा झाला  होता. तर, दुसरीकडे  दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.  प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली गेली होती.

साधारण अर्धातास सर्व लोकल आहे त्या ठिकाणीच थांबवण्यात आल्या होत्या. युद्धपातळीवर काम करून तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे सेवा पुर्ववत झाली. मात्र, यानंतर चर्चगेट ते दादर स्टेशनपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाल्याचे दिसले. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड उद्भवल्याने प्रवाशांची चांगलीच अडचण झाली. चारही मार्गांवरील गाड्या थांबण्यात आलेल्या असल्याने  रेल्वे सेवा हळूहळू सुरळीत होत आहे.