News Flash

‘पोलीस कविते’प्रकरणी तक्रारीवर काय कारवाई केली?

आझाद मैदानात मागील ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत महिला वाहतूक पोलीस निरीक्षकाने केलेल्या कवितेविरोधातील तक्रारीबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला

| January 30, 2013 09:52 am

आझाद मैदानात मागील ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत महिला वाहतूक पोलीस निरीक्षकाने केलेल्या कवितेविरोधातील तक्रारीबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला केली.
ही कविता जातीय तेढ निर्माण करणारी असून सुजाता पाटील या महिला पोलीस निरीक्षकाने ती लिहिली आहे. त्याद्वारे सामाजिक बांधीलकी धोक्यात आणली जात आहे, असा आरोप करीत अमीन मुस्तफा इद्रीसी आणि हिंचारातील जामिनावर सुटलेल्या दोन आरोपींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सहआयुक्त (प्रशासन) हेमंत नागराळे आणि ही कविता प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. पाटील यांनी या कवितेबाबत माफी मागितली असल्याची माहिती सरकारी वकील रेवती ढेरे यांनी न्यायालयाला दिली. मात्र याचिकादाराने या प्रकरणी केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश देत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १८ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 9:52 am

Web Title: what action is taken on police poet case high court required the information
टॅग : High Court
Next Stories
1 मित्राला धडा शिकविण्यासाठी विमानतळ उडविण्याची धमकी
2 मराठवाडय़ातील दुष्काळी भागांना दिलासा
3 विनापरवाना घोडागाडय़ा जप्त करा
Just Now!
X